97308 48504 / 9765 313131

Pune : Every Saturday : 10 am to 5 pm

Wada : Every Thursday & Sunday : 10 am to 5 pm

Thane : Monday to Friday : 10 am to 5 pm

मनाला लगाम धुम्रपानाला विराम

मनाला लगाम धुम्रपानाला विराम

मला धूम्रपान थांबवायचे आहे (I want to stop smoking ) असे म्हणणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या मनावर ताबा ठेवणे खूप आवश्यक आहे. कारण हे व्यसनच असे आहे कि आपले मन सारखे त्याचीच मागणी करत राहते. “मन पाखरू पाखरू उभ्या पिकातले ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येई पिकावर “ या बहिणाबाईंच्या ओळी अगदी सार्थ आहेत. मनाचा अवखळपणा अगदी लहान मुलाप्रमाणे असतो. त्याला नवीन गोष्टीचे प्रचंड कुतुहूल असते. कोणत्याही गोष्टीची मनाई केली कि तीच गोष्ट तुम्हाला हवीशी वाटते.

या मनरूपी पाखराला आवर घालणे तसे कठीणच! परंतु तुम्ही धूम्रपानाची तलफ सोडावयास (quit smoking cravings) हवी. परंतु मनावर विजय मिळवल्याशिवाय हे शक्य नाही.नाहीतर तुम्हाला अनेक प्राणघातक दुर्धर आजार जसे कि तोंडाचा व घशाचा कर्करोग , फुफ्फुसाचे रोग,हृदयरोग व इतर अनेक रोगांना तोंड द्यावे लागेल. तसेच मनाची अस्थिरता , न्यूनगंड, नैराश्य असे मानसिक रोगही होऊ शकतात.

सौरभ हा महाविद्यालयात शिकत असताना त्याला सिगारेटचा नाद लागला. प्रथम कुतुहूल म्हणून केलेले हे व्यसन एवढे वाढले कि त्याला आता श्वास घेण्यास त्रास होत असून डॉक्टरने त्याच्यावर औषधोपचार चालू केले आहेत. तसेच त्याला मानसिक बाळ वाढावे म्हणून ध्यानधारणा करण्यास सांगितले आहे.

केशव हा एक कुटुंबवत्सल व्यक्ती! नोकरीत असलेल्या ताणतणावांमुळे तो या व्यसनाच्या आहारी गेला. त्याचे व्यसनाधीन मित्रपरिवारनेही यात भट घातलेली आहे. तो आता सिगारेट ओढणे थांबवण्यासाठी (quitting cigarette) प्रयत्नशील आहे. तो जवळच्या व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रात (de -addiction centre ) उपचार घेत आहे.

मनावर ताबा ठेवण्यासाठी काय कराल?

  • तुम्ही दररोज नित्यनेमाने ध्यानसाधना करा . त्यामुळे मनाचे भरकटणे कमी होईल. धूम्रपानाची तलफ सोडण्यासाठी (quit smoking cravings) याचा खूप उपयोग होईल.
  • आपले शरीर आणि मन तंदुरुस्त असावे तुम्ही म्हणून प्रयत्न करा . कारण निरोगी शरीरात निरोगी मन कार्यरत असते.त्यासाठी योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली दररोज तुम्ही योगासने व प्राणायाम करा .
  • मनात असलेला न्यूनगंड काढून टाका. त्यामुळे मनुष्य व्यसनाधीन होतो. प्रत्येक माणसात काहीतरी सामर्थ्य आहे. ते ओळखा. येणाऱ्या नैराश्यापासून दूर रहा. असे नकारात्मक विचार तुम्हाला आपल्या उद्दिष्टांपासून दूर नेतात.
  • निसर्गाकडे पहा. प्राणी पक्षी प्रत्येक दिवस किती आनंदाने आणि उत्साहाने व्यतीत करतात! तुम्हीसुद्धा रोज आनंदी व उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. तुमचा भविष्यकाळी उज्ज्वल असेल अशी खात्री बाळगा.
  • धूम्रपानाची तलफ सोडण्यासाठी (quit smoking cravings ) त्या वेळी मन इतर गोष्टीत रमवा . कारण हि तलफ फक्त ३ ते ५ मिनिटेच असते. रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका.कोणतातरी छंद जोपासा. वाद्ये वाजवा. पुस्तक वाचा. संगीत ऐका . तुम्ही पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडा अथवा एखादा खेळ खेळा. त्यामुळे तुमच्या व्यसनापासून मन दूर जाईल. आजचे आयुष्य हे क्षणभंगुर झाले आहे. तुम्हाला मिळाले आयुष्य हे परमेश्वराची देणगी आहे. त्यासाठी नित्यनेमाने त्याचे आभार माना.
  • तुमच्या गुरुपाशी अथवा ईश्वरापाशी श्रद्धा असू द्या. तुमच्या पाठी अशी एखादी शक्ती आहे असा विश्वास खूप महत्वाचा आहे.रोज नामस्मरण चालू ठेवा.
  • आपला प्रत्येक दिवस हा सत्कारणी लावणे हे आपले कर्तव्य आहे. असे मानून आपण रोज सत्कर्मे करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मनाला शांती लाभेल. स्थिरता येईल.
  • तुम्ही धूम्रपान सोडण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा. यश हे लगेच मिळत नसते. त्यासाठी वाट पाहावी लागते. आज ना उद्या हि गोष्ट साध्य होणारच हे मनाशी निश्चित करा.
  • धुम्रपानामुळे आपल्याला काय त्रास भोगावा लागला आणि ते सोडल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो आहे त्याचा विचार रोज करा.
  • तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य तो औषधोपचार करा. तंबाखू सोडण्यासाठीची औषधे (tobacco quit medicines) वैद्यकीय सल्ल्याने नियमितपणे वापरा. त्यात खंड पाडू नका.
  • मानसिक ताणावर व्यसन करणे हा उपाय नाही. समोरील समस्यांना न घाबरता शांत राहावे. त्यावर विचार करून तोडगा काढावा.
  • व्यसन सोडताना “मी उद्या धूम्रपान सोडेन” असे न म्हणता आजच्या दिवसापासूनच सुरवात करा. वर्तमान काळात जगायला शिका. कारण उद्या कधीच उजाडत नाही.
  • ज्या व्यक्ती धूम्रपान सोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांचे अनुभव ऎका . त्यांना या मार्गात काय अडचणी आल्या ते पाहून त्यावरून धडे घ्या. त्यांनी धूम्रपान सोडण्यासाठी काय उपाय (remedies to quit smoking ) केले ते लक्षात घ्या.
  • “मला धूम्रपान थांबवायचे आहे” ( I want to stop smoking ) सोडणार आहे हा विचार रोज मनाशी बोला व त्यावर ठाम राहा.
  • "मला हे जमणार नाही"अश्या नकारात्मक विचारांनी धूम्रपान सोडण्याच्या मार्गात अडसर निर्माण होईल. उलट "मी हे व्यसन सोडवूनच दाखवीन" असे चांगले विचार सकारात्मक ऊर्जा निर्माण देतील .
  • धूम्रपान सोडण्याचे सोपे उपाय (easy way to stop smoking ) नसून आपल्याला कठोर निश्चय करून पुढे जायचे आहे हे समजून घ्या . मधेच धीर सोडू नका.
  • स्वतःसाठी तसेच तुमच्या कुटुंबासाठी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. आपले कुटुंब हे प्रत्येक माणसासाठी अत्यंत महत्वाचे असते. त्यांच्यावर तुमच्या व्यसनाचा काय वाईट परिणाम होतो आहे याचा विचार करा.
  • तुमचे हित चिंतणाऱ्या मित्रांमध्ये वेळ घालवा. त्यांच्याबरोबर आपली सुखदुःखांची चर्चा करा. तुम्हाला दिलासा मिळेल. समस्यांवर उपाय मिळेल. चिंता कमी होतील. सिगारेट ओढणे थांबवण्यासाठी (quitting cigarettes ) मदत होईल.

या तुमच्या प्रवासात तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घ्या येथे धूम्रपान सोडण्यासाठी काय उपायकारक ठरते(what helps to quit smoking ) हे सांगितलॆ जाते.. तुमचे मनस्वास्थ चांगले ठेवण्यासाठी समुपदेशन केले जाते. मुंबई ,पुणे व ठाणे येथे हि व्यसनमुक्तीसाठी पुनर्वसन केंद्रे (de addiction centres at Mumbai , Pune and Thane ) आहेत . व्यसन सोडण्यासाठी तुमचे कुटुंबीय कशी मदत ते सांगितले जाते.तंबाखू सोडण्यासाठीची औषधे (tobacco quit medicines ) येथे दिली जातात.

www.letsquit.net यासारख्या धूम्रपान सोडण्यासाठीच्या संकेत स्थळांची (quit smoking sites) तुम्ही घेऊ शकता. हि स्थळे तुम्हाला मानसिक बळ वाढविण्यासाठी वैद्यकीय मदत देतील. तसेच धूम्रपान सोडण्यासाठी युक्त्या (leave smoking tips) तुम्हाला येथे मिळतील.

वामनराव पै यांनी सांगितलेच आहे कि “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!”. तुमचे आयुष्य कसे घडवायचे हे तुमच्या हाती आहे . म्हणून तुम्ही आपले विचार व वागणे बदलले पाहिजे. तरच या चंचल मनावर ताबा ठेवता येईल. तुमचे आयुष्य धूम्रपान मुक्त होईल.

संदर्भ
www.verywellmind .com

Book your Appoinment




Call Now Enquire Now